CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषण

Continues below advertisement

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषण
 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वकांशी लोह खनिज प्रकल्पाच्या DRI प्लांट चे उद्घाटन करणार आहे..  - स्लरी पाईप लाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू  ग्राईडींग युनिटचे भूमिपूजन ही ते करणार आहे.   - थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोनसरी येथील प्लान्ट मध्ये पोहोचतील,    .....   प्रभाकरन Lloyds Steel  MD   2018 मध्ये या प्लांट चे भूमिपूजन केले होते.. आणि आज प्लांट चे उद्घाटन करत आहों... आजच हेडरी पासून कोनसरी दरम्यान स्लरी पाइपलाइन चे आज भूमिपूजन करत आहों... हजारो तरुणांना रोजगार दिले असून अनेकांना प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया ला पाठवले आहे..   स्थानिक जनतेला क्षणा आणि आरोग्याच्या विविध सोयी सामाजिक उद्दिष्ट म्हणून देत आहोत...   आमचे सहा हजार कर्मचारी आहे जे तिला दोन वर्षापासून आमच्या सोबत काम करत आहे आज आम्ही त्या सर्वांना कंपनीमध्ये शेअर होल्डर म्हणून सोबत घेत आहोत...   जगाचा सर्वोत्तम स्टील प्लांट आम्ही या ठिकाणी बनवून दाखवू...   काही आत्मसुमार पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना जे आता आमच्या सोबत काम करत आहेत त्यांना ही आम्ही शेअर होल्डर बनवत आहों..  ..  मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत -  एक जानेवारी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला दिवस आहे, नवीन वर्ष गडचिरोली जिल्ह्यासाठी नवीन पहाट घेऊन आला आहे...  अनेक वर्ष गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा असल्याचे बोलत होतो... गडचिरोली चे पूर्ण परिवर्तन करण्याचा प्रयत्न केले दहा वर्षांनी सातत्याने करत आहोत....  गेल्या चार वर्षांमध्ये कोणीही माओवाद्यांकडे कोणी ही जात  नाहीये... संविधानाला मान्यता देत अनेक माओवादी मुख्यधारेत येत आहे..   ज्या भागामध्ये स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर ही बस जाऊ शकत नव्हती, रस्ता नव्हता, त्या गर्देवाडा भागात रस्ता, पूल तयार झाला, बस ही सुरू झाली, त्यामुळे छत्तीसगड सोबत कनेक्टिव्हिटी निर्माण होत आहे...  आज पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात आलेल्या स्थानिकांच्या डोळ्यात आशेचा किरण पाहायला मिळाला...  सुरजागड खाणीचा आणि त्यावर आधारित कारखान्याचा काम गेले अनेक वर्ष सुरू होता, मात्र त्यात गती येत नव्हती अडथळे येत होते... कंपनीचे लोक माझ्याकडे आले मदत मागितली, मी गडचिरोलीच्या स्थानिकांच्या विकास करण्याची अट घातली... स्थानिक पातळीवर उद्योग स्थापन करावे लागेल असे सांगितले... त्यांनी होकार दिले... पोलिसांच्या मदतीने हळूहळू काम सुरू झाली...   सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होता, कारण त्यांना चुकीची माहिती दिली जात होती.. मात्र हळूहळू त्यांचाही सहकार्य वाढला...   2018 मध्ये मी जेव्हा या कारखान्याचे भूमिपूजन केले होते, तेव्हा शंका व्यक्त केली होती की भूमिपूजन नंतर कारखाना खरोखर स्थापन होईल का?? मात्र मला आज आनंद आहे की मुख्यमंत्री म्हणून मी ज्या कारखान्याच्या भूमिपूजन केले आज मुख्यमंत्री म्हणून त्याचा उद्घाटन करत आहे...  या ठिकाणी टप्प्याटप्प्याने 25000 कोटींची गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे...  प्रभाकरन यांनी स्थानिकांच्या विकासाकडे लक्ष घातले... आज त्यांच्याकडून तब्बल 1000 कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे... काम करणारे कर्मचारी कंपनीचे मालक झाले आहे.... पुढील पाच वर्षात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या शेअर्सचे मूल्य शेअर बाजार मध्ये अनेक पटीने वाढतील....  इथे आपण जी मायनिंग करत आहोत, ती स्थानिकांना लुटण्यासाठी नाही, तर स्थानिकांना सबळ बनवण्यासाठी करत आहो...  गडचिरोलीत खाण काम होत असताना मी विश्वास देतो की गडचिरोलीच्या जल, जंगल, जमीनला आम्ही नखही लागू देणार नाही त्याचा नुकसान होऊ देणार नाही...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram