Gadchiroli Rising: गडचिरोली आता राज्याचं प्रवेशद्वार; लवकरच ग्रीन स्टील हब होणार

Continues below advertisement
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यात जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 'गडचिरोली आता राज्याचं शेवटचं टोक नाही तर राज्याचं प्रवेशद्वार आहे,' अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी सिरोंचा येथे नवीन नर्सिंग कॉलेज आणि शाळेची घोषणा केली, तसेच अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण केले. गडचिरोली लवकरच 'ग्रीन स्टील हब' म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूर्वी शिक्षेची पोस्टिंग समजली जाणारी गडचिरोली आता विकासाचे केंद्र बनत असून, अधिकारी स्वतःहून येथे पोस्टिंग मागत आहेत, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola