ABP News

CM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVE

Continues below advertisement

CM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVE

 मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा... असं म्हणत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झाले. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतली आणि त्यासोबत 2019 मध्ये त्यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवला.  अशातच एबीपी न्यूजशी खास संवाद साधताना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले असून त्यांच्या विरोधकांमुळेच त्यांना लढण्याचं मनोबल मिळालं, असं ते म्हणाले आहेत. तसेच, शिंदेंच्या नाराजीवरही देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, उपमुख्यमंत्रिपदावरुन शिंदेंच्या नाराजीवरही ते स्पष्ट बोलले आहेत. शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास इच्छुक नव्हते, असं नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, मुख्यमंत्रिपदावरुन बरीच खलबतं झाली. शिंदेंना मु्ख्यमंत्रिपदी कायम राहायचं होतं, ते उपमुख्यमंत्रिपद घेण्यास तयार  नव्हते, त्यानंतर त्यांना कोणत्याच पदावर न राहता संघटनेसाठी काम करायचं होतं, अशा अनेक चर्चा कानावर येत होत्या. अशातच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली मुलाखत एबीपी न्यूजला दिली. या मुलाखतीत बोलताना नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. 

शिंदेंच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? 

शिंदे नाराज होते, तुमच्यापेक्षा ते जास्त चांगले मुख्यमंत्री असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत होते? याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिंदेंनी चांगलं काम केलं. अडीच वर्षात आम्ही सर्वांनी टीम म्हणून चांगलं काम केलं. माझे सहकारी जर लोकांच्या मनात जागा मिळवत असतील, तर मला त्याचा आनंद आहे. मी बेस्ट सीएमसाठी नाही, जनतेचं काम करण्यासाठी आलोय."

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "शिंदे उपमुख्यमंत्री बनू इच्छीत नव्हते, असं नाही. मी पण इच्छुक नव्हतो. मात्र, पक्ष चालवण्यासाठी ही गरज असते."

विधानसभेतील विजयाचं श्रेय फडणवीसांनी कुणाला दिलं? 

नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की, "मी विरोधकांचे आभार मानतो, त्यांनी मला टार्गेट केलेलं जनतेला आवडलं नाही. मी सगळ्यांना माफ केलंय हाच माझा बदला. विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला देईल. कित्तेक वर्षानंतर इतकं मोठं यश मिळालंय. आम्ही महिला, शेतकरी, तरुणांसाठी योजना आणल्या, जनतेनं मोदींवर विश्वास टाकलाय. 2014 च्या देवेंद्र फडणवीसांशी मी तुलना केली, तर मी स्वताला मॅचोअर समजतो.."

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram