Waqf Board Meeting | वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत खडाजंगी ABP Majha
Waqf Board Meeting | वक्फ विधेयकावरील संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत खडाजंगी ABP Majha
ही बातमी पण वाचा
Pooja Khedkar : पूजा खेडकरला अटकेपासून 4 ऑक्टोबरपर्यंत दिलासा, तपासात मोठा कट समोर येत असल्याचा पोलिसांचा दावा!
Pooja Khedkar : बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. या खटल्याशी संबंधित वकिलांनी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला. आता या प्रकरणाची सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी होणार असून, तोपर्यंत पूजा खेडकरला दिलेला दिलासा कायम असेल. यापूर्वी, 5 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पूजाने न्यायालयाला सांगितले होते की ती एम्समध्ये तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार आहे. 4 सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले होते की पूजाने यूपीएससीला सादर केलेल्या दोन अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा संशय आहे.
सुनावणीनंतर न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले होते की, पोलिसांनी या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी 10 दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने यूपीएससीने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आणि पूजाला 26 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. यूपीएससीने पूजा खेडकरवर खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती.
पोलिसांनी स्टेटस रिपोर्ट दाखल केला
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर प्रकरणात 4 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात स्थिती अहवाल दाखल केला आणि माहिती दिली की निलंबित प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हिने दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते, त्यापैकी एक बनावट असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी या स्टेटस रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही यूपीएससीने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. नागरी सेवा परीक्षा- 2022 आणि 2023 दरम्यान पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्रे (एकाधिक अपंगत्व) सादर केल्याचे उघड झाले, त्यानुसार तिला (पूजा) अहमदनगर, महाराष्ट्राच्या वैद्यकीय प्राधिकरणाने जारी केले.
यूपीएससीला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही
UPSC ने 31 जुलै रोजी पूजाची निवड रद्द केली होती आणि तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घातली होती. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, UPSC ला पूजाला CSE-2022 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले. आयोगाने दिल्ली पोलिसांकडेही गुन्हा दाखल केला होता. पूजाने 28 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, यूपीएससीला तिच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. पूजा म्हणाली की UPSC ने 2019, 2021 आणि 2022 च्या व्यक्तिमत्व चाचण्यांदरम्यान गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे (डोके आणि बोटांचे ठसे) माझी ओळख सत्यापित केली आहे. माझ्या सर्व कागदपत्रांची आयोगाने 26 मे 2022 रोजी व्यक्तिमत्व चाचणीत पडताळणी केली.
या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद म्हणाले होते की, दिल्ली पोलिसांना या प्रकरणी नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल करायचा आहे, त्यामुळे खेडकर यांच्या अंतरिम जामीन याचिकेची सुनावणी ५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.