Chattisgadh:छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक

७ नोव्हेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात बिजापूर जिल्ह्यात चकमक झाली होती. त्या चकमकीत दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षायंत्रणेला यश आले होते . चकमकी नंतर आपल्या साथीदाराचे मृतदेह पदोडाच्या जंगलातून घेऊन जातांना माओवाद्यांची ड्रोनमधून घेतलेली दृश्यं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.   छत्तीसगडचा बिजापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या गडचिरोलीला लागून असल्याने या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस देखील अलर्ट मोड वर आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola