ST Bank Scam : अपमानास्पद बोलल्याचा आरोप, ST बँक बैठकीत सदावर्ते आणि शिंदे गट भिडले
Continues below advertisement
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्या समर्थक गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बैठकीत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हा वाद उफाळून आल्याचे समजते. दिवाळी बोनस वाटपाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारीत झाले. या दोन्ही गटांमधील वाद जुना असून, बँकेवरील वर्चस्व आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून, एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement