ST Bank Clash: 'भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून' ST बँक बैठकीत राडा, Sadavarte आणि Shinde गट एकमेकांना भिडले
Continues below advertisement
मुंबईतील एसटी बँकेच्या (ST Bank) संचालक मंडळाच्या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात जोरदार राडा झाला. शिंदे गटाने सदावर्ते गटावर 'भ्रष्टाचाराचे आरोप' केल्यानंतर वाद पेटला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. बैठकीत शिंदे गटाचे सदस्य व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचा आरोप झाल्याने तणाव आणखी वाढला. दोन्ही गटांच्या संचालकांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या आणि शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, प्रकरण आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. १९ संचालकांच्या मंडळात सदावर्ते गटाचे १० तर शिंदे गटाचे ९ सदस्य आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement