City Sixty : मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट सिटी सिक्स्टी ABP Majha

Continues below advertisement

City Sixty : मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट सिटी सिक्स्टी ABP Majha

महाविकास आघाडीची जागावाटपसंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील जागावाटप संदर्भात मागील दोन बैठकीत चर्चा झाली... मात्र जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाहीये... - वेदांत 

मुंबई - कायद्याचा गैरवापर करून करोडो रुपयांचा फायदा घेणाऱ्या बिल्डरांचा एबीपी माझाने पोलखोल केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याबाबत प्रशासकीय लेव्हलला काय हालचाल सुरू आहे याची अपडेट देईल. तसेच विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचा इंटरव्यू देईल - निलेश ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांकडून संपावर जाण्याचा इशारा देऊ केलाय. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे यामागणीसाठी उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करतील.

 मुंबई - बदलापूरमध्ये घडलेल्या शाळकरी मुलींवरील बलात्काराच्या घटनेची दखल घेत हायकोर्टानं दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी. पोलींसांनी गुन्हा नोंदवताना केलेला हलगर्जीपणा, शाळा व्यवस्थापनाचा ढिसाळपणा आणि प्रशासनाला उशिरानं आलेली जाग या मुद्यांवर हायकोर्टानं राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. याप्रकरणावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. - अमेय 

मुंबई - जितेंद्र आव्हाड यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. राष्ट्रवादीचे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या "राम हा मांसाहारी होता"  या वादग्रस्त प्रकरणी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या सातही एफआयआर एकत्र करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोर्टाच्या निर्देशांनुसार सर्व गुन्हे शिर्डीत वर्ग करण्यात आलेत. त्यावर आज सुनावणी होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram