City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा एका क्लिकवर : 15 June 2024
City 60 SuperFast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवाग आढावा एका क्लिकवर : 15 June 2024
कोस्टल रोडचं 89.67 टक्के काप पूर्ण, जुलै अखेर नंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास १२ मिनिटात पूर्ण करणं शक्य होणार, कोस्टल रोड वरळी-वांद्रे सीलिंकला जोडण्यासाठीचं कामही प्रगतिपथावर.
मुंबई – कोल्हापूर ही १६ डब्यांची एक्स्प्रेस आता १९ डब्यांची होणार, सीएसएमटी येथील फलाट विस्तारीकरणामुळे एक्स्प्रेसच्या डब्यांत वाढ.
उद्या हार्बर रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक, सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत कुर्ला- वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार.
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक, खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी विभागवार पाणीकपात करण्याचा निर्णय.
उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा आजपासून सुुरु, अनेक शाळांमध्ये गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचं स्वागत
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आजपासून पुन्हा सुरू, वसंतराव चौगुले शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश