City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा :17 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता, पवार गट मविआकडे १०० जागांचा प्रस्ताव ठेवणार.

पुण्यातील विधानसभेच्या जागांवरुन ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचाही सहा जागांवर दावा, आठ पैकी ६ मतदारसंघ स्वतकडे ठेवण्याची दोन्ही गटांची मागणी. 

पुण्यातील आठपैकी सहा विधानसभा आम्हाला लढवायला मिळाव्यात, आम्हाला पुणेकरांच्या समस्यांवर काम करण्याची संधी मिळेल. ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांची मागणी. कोथरुड, कसबा , पुणे कँटनमेंट, हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघ मिळावा असं मोरेंचं पत्र.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन 'मॅक्झिमम विदर्भ', विदर्भावर खास लक्ष देणार तर भास्कर जाधवांवर याची जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक स्थितीचा घेणार आढावा. भाजपचे प्रवीण दरेकरही राहणार बैठकीला उपस्थित. साखर संकुलात बैठकाच आयोजन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram