ABP News

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 03 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM  : 03 June 2024 : ABP Majha
लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला उरले काही तास,  देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महामंडळात पार पडणार,  मतमोजणीसाठी जवळपास 1500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती,  तर मतमोजणी केंद्रावर 600 पोलिसांचा बंदोबस्त.  
रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी MIDCमध्ये होणार, सध्या या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात. 
मतमोजणीच्या दिवशी रत्नागिरीत कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी क्यूआर कोडची व्यवस्था, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतरच नेमून दिलेल्या ठिकाणांवरती जाता येणार. रत्नागिरी पोलिसांकडून एकूण तीन क्यूआर कोडची निर्मिती. 
शिवडीच्या स्ट्राँगरुमबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी. 
रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, एक हजारहून अधिक कर्मचारी तैनात असणार, अलिबागमधील नेहूलीमधील क्रीडा संकुलात मतमोजणी होणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram