City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 18 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसण्याची शक्यता, शाहांच्या वक्तव्याबाबत इंडिया आघाडीचे खासदार आज सेबीकडे तक्रार करणार. 

सेबीकडे अमित शाहांची तक्रार करण्याआधी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवारांची भेट घेतली,  सिल्वर ओक निवासस्थानी जात घेतली भेट. 

शिवसेना खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अमित शाह यांच्याविरोधात सेबीकडे तक्रार करणार, संजय राऊतांची माहिती.

'बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांनी वर्धापनदिन साजरा करू नये', खासदार संजय राऊतांचं वक्तव्य.

'चोरीचपाटीने वायकरांचा विजय, त्यांनी आम्हाला शिकवू नये', 'रवींद्र वायकर डरपोक, ईडी सीबीआयला घाबरून पळाले', संजय राऊतांची टीका.

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, उत्तर-पश्चिममधील मतमोजणी वादानंतर वायकर राज ठाकरेंच्या भेटीला. 

याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram