City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 9 नोव्हेंबर 2024 :  ABP Majha

राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यांनी आज अकोल्यात एका सभेला संबोधित केलं. या सभेत त्यांनी काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींमध्ये भांडण लावू पाहात आहे, असा आरोप केला. तसेच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वळोवेळी अन्याय केला, असाही दावा केला. सोबतच त्यांनी 'एक हैं तो सेफ हैं' असं म्हणत मतविभाजन टाळण्याचा सल्ला दिला.

काँग्रेसला एससी समाजाला कमजोर करायचंय

"अनुसूचित जाती प्रवर्गतील वेगवेगळ्या जातींमध्य एकमेकांशी भांडण व्हावे, असे काँग्रेसला वाटतं. एसी समाजाच्या वेगवेगळ्या जाती आपापसात भांडत राहिल्या तर त्यांचा आवाज कमी होईल, हे काँग्रेसला माहिती आहे. असं झालं तर काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे चांभार आणि मातंग जातीत भांडण व्हावे असे काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेसला मातंग जातीला महार जातीविरुद्ध उभं करायचं आहे. कैकाडी समाजाला खाटिक जातीशी काँग्रेसला लढवायचं आहे. एससी प्रवर्गाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र न राहता भांडण करत राहिले तर त्याचा काँग्रेस फायदा उचलणार आहे. एससी समाजाला कमजोर करून काँग्रेसला सरकार स्थापन करायचंय. काँग्रेसची ही चाल आहे. काँग्रेसचे हेच चरित्र आहे. म्हणूनच तुम्हाला काँग्रेसच्या या चालीपासून तुम्ही सावध राहायचे आहे. तुम्ही 'एक हैं तो सेफ हैं' हे लक्ष ठेवायचं आहे," असं मोदी म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram