City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे नाना पटोले - साकोली विरेंद्र जगताप- धामणगाव यशोमती ठाकूर- तिवसा विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी अमित झनक- रिसोड नितीन राऊत- उत्तर नागपूर विकास ठाकरे- पश्चिम नागपूर रणजित कांबळे- देवळी (वर्धा) सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर) डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर बबलू देशमुख- अचलपूर विदर्भातील जागांवरून वाद महाविकास आघाडीत सध्या विदर्भातील जागांवरून वाद चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भात एकूण 12 जागा हव्या आहेत. तर काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यास तयार आहे. या भागात आमची ताकद जास्त असून आम्हीच या भागातून अधिक जागांवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी अनेक बैठका पार पडल्या. मिळालेल्या माहितीनुसार आता या जागांवर जवळपास तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.