City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 12 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 12 ऑक्टोबर 2024 :  ABP Majha 

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हे आहेत. आज दसऱ्याच्या मुहुर्तावर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 6 दसरा मेळावे होणार असून भगवानगडावर मुंडे आणि नारायणगडावर जरांगे आमनेसामने उभे ठाकणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या नेतृत्वातला हा पहिला दसरा मेळावा आहे. बीडमधील नारायणगडावर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून 900 एकरावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव नारायणगडावर दाखल होणार असून या दोन्ही मेळाव्यात जरांगे आणि पंकजा मुंडे काय बोलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 900 एकरावर हा मेळावा होणार असून 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप कायम असून मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आता ते काय भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सर्वांचे लक्ष आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram