#Vaccination ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटरबाहेर लसीकरणासाठी गर्दी,अपॉईंटमेंट न मिळताही नागरिक पोहोचले
Continues below advertisement
ठाणे : देशभरात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होणार आहे. या शनिवारपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करता येणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. 18 ते 44 वर्षांमधील लोकांना कोरोना लसीकरण करण्यासाठी आजपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य असणार आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की, या लोकांना वॉक-इन किंवा थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करण्याची सुविधा मिळणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अॅपचा वापर करु शकता. लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं अनिर्वाय असेल.
Continues below advertisement
Tags :
Corona Thane Corona Patients Thane News Tmc COVID Center Thane Corona Tmc Officer Global Covid Center Thane Vaccination