Navi Mumbai येथील प्रस्तावित गोल्फ कोर्सचा प्रकल्प गुंडाळला, कायदेशीर अडचण टाळण्यासाठी निर्णय

नवी मुंबई विमानतळाला लागून प्रस्तावित असलेला नवी मुंबईतला गोल्फ कोर्सचा प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आलाय. प्रस्ताविक गोल्फ कोर्स कायदेशीर गुंत्यात अडकण्याची भीती असल्यानं प्रकल्प गुंडाळल्याची माहिती आहे... सिडको आणि एका खासगी विकासकाकडून 34 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार होा. मात्र  हा गोल्फ कोर्स ज्या भागावर प्रस्तावित होता ती खार जमीन आणि कांदळवन आहे... या ठिकाणी मोेठ्या प्रमाणात पक्षांचा अधिवास असून हिवाळ्यात इथे परदेशी पक्षांचंही वास्तव्य असतं.. त्यामुळे या विरोधात नवी मुंबईतील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती.. त्यामुळे कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी प्रकल्पच बासनात टाकल्याची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola