CIDCO Land Scam: '5 हजार कोटींच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार शिरसाटांचा राजीनामा घ्या' Rohit Pawar

Continues below advertisement
नवी मुंबई (Navi Mumbai) येथील सिडको (CIDCO) भूखंड प्रकरणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तत्कालीन सिडको अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'नवी मुंबईमधल्या सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच लागतायत ना तर वनविभागानेच दिलेल्या कबुली पत्राचे हे घ्या आणखी पुरावे', असे आव्हान देत रोहित पवार यांनी एक्सपोस्टद्वारे (X Post) नवीन पुरावे सादर केले आहेत. यापूर्वीही त्यांनी साडेबारा हजार पानांचे पुरावे सादर केल्याचा उल्लेख केला आहे. वनविभागाने दिलेल्या तक्रारी आणि कबुलीजबाबाच्या आधारे पवार यांनी शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले असून, या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola