Vasai Christmas : मुंबई जवळच्या वसईत नाताळची धूम, गावागावात कॅरल सिंगिगचे सूर
नाताळ चा सण आता काही दिवसांवर आला आहे. आणि या नाताळची धूम वसईत पाहायाला मिळतेय. नाताळ निमित्ताने वसईत सध्या प्रभू येशूच्या आगमन काळाची तयारी सुरु आहे. आणि त्यासाठी गावागावात कॅरल सिंगिग चे सूर निनादत आहे. तरुण तरुणी गावागावात जावून प्रभू येशूची गाणी म्हणत आहे. तर या कॅरल सिंगिग मध्ये बच्चे कंपनीसाठी सांताकोल्ज देखील डान्स करत असतो. वसईच्या समता नगर परिसरात मेरी किस्मस म्हणत ओवर टोज ऑफ कायर या 25 जणांच्या ग्रुपने, मराठी, हिंदी, इंग्लिश, गाण्याने वसईकरांना व बच्चे कंपनीला नाचवल आहे.
कॅरल सिंगिग म्हणजे प्रभू येशूची गाणी म्हणायची. वसईच्या गावागावात सध्या कॅरल सिंगिगचं सूर ऐकायला मिळत आहे. या कॅरल सिंगिग द्वारे ख्रिसताच्या जन्माची तयारी करत असतात. या कॅरल सिंगिगची तयारी हे तरूण मागील एक महिन्या पासून करीत असतात. नोकरी आणि कॉलेज सांभाळून हि मुल प्रभू येशूच्या गाण्याची तयारी करत असतात. संध्याकाळी सात वाजल्यापासून वेगवेगळया ठिकाणी चार ते पाच ठिकाणी हे कॅरल सिंगिग गायलं जातं. वसई विरार परिसरात असे अनेक ग्रुप असतात. या हे कॅरल सिंगिगच्या माध्यमातून एक संदेश हि दिला जातो. देवाने प्रत्येकाला वेगवेगळ्या गुणांची देणगी दिली आहे. या गुणांचा वापर करून समाजात जे गरजवंत आहेत त्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करुया असा अनोखा संदेश या कॅरल सिंगिग च्या माध्यमतून दिला आहे.