Chiplun Flood : चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार; एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं

हवामान विभागानं दिलेला अंदाज खरा ठरवत रात्रभर मुंबईसह कोकणातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात जोरदार सरी बरसल्या. चिपळूण शहराचं एका रात्रीत रुपडं पालटलं. चिपळूण शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत. ५ हजाराहून अधिक नागरिक अडकून पडलेत. रायगडच्या महाड तालुक्यातही पावसानं कहर केलाय. शिवारात पाणी गेल्यानं भातशेतीचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्याला आहे. साताऱ्यात कृष्णा नदीला पूर आल्यानं संगम माहुलीमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. इथली लाकडं पाण्यात वाहून गेली आहेत. तर तिकडे मुंबईशेजारील वसईतला सनसिटी-गास रस्ता मागील ४ दिवसांपासून पाण्याखाली गेलाय. आता बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असली तरी, साचलेलं पाणी ओसरायला वेळ लागेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola