Chiplun Flood : म्हणून चिपळूण शहरात पूर आला, पाटबंधारे विभागाकडून अहवाल शासनाला सादर

Continues below advertisement

चिपळूणच्या पुरासंदर्भात एक मोठी बातमी.. चिपळूण शहरात आलेला पूर कोणामुळे आला, चिपळूणची दैना व्हायला कोण जबाबदार आहे अ चिपळूण शहरात आलेला पूर हा मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती आणि कोळकेवाडी धरणातील विसर्ग यामुळेच आला असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागानं दिलाय. चिपळूणच्या पुरासंदर्भात प्राथमिक अहवाल पाटबंधारे विभागानं शासनाकडे सादर केलेला आहे. जगबुडी नदीचं पाणी वाशिष्ठी नदीला मिळालं आणी त्यात समुद्रात भरती असल्यानं पाण्याचा निचरा न झाल्यानं फुगवटा निर्माण झाला. त्यामुळेच चिपळूण शहरात अभूतपूर्व पूर आला असं या अहवालात म्हटलेलं आहे. तसंच कोळकेवाडी धरणातूनही ८ हजार ४०० क्यूसेक वेगानं विसर्ग होत असल्याची नोंदही या अहवालात आहे. या अहवालात पुराची कारणं आणि त्यासोबत उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram