Chipi Airport : चिपी विमानतळासाठी आता नवा मुहूर्त, खासदार Vinayak Raut यांची माहिती : Sindhudurg

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचा गणेशोत्सवाचा मुहूर्त टळून आता नवरात्रोत्सवाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातील चिपी विमानतळ विमान वाहतुकीला पूर्णपणे सज्ज झालेला आहे. परवाच्या दिवशी मी दिल्लीला होतो. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एव्हिएशन सेक्रेटरी, डिजिसीएचे चेअरमन आणि हवाई वाहतूक करणारी अलायन्स कंपनीचे या सर्वांशी संपर्क साधला असता येत्या 7 ऑक्टोबरला चिपी विमातळावरून विमान वाहतुकीस सज्ज असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

7 ऑक्टोबर नवरात्र उत्सवातील पहिला दिवस या दिवसापासून सिंधुदुर्गातून विमान वाहतूक सज्ज आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्याची तयारी चालू करण्याची विनंती हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवज ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना केली असून या नवरात्र उत्सवातील पहिला दिवस सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टीने सुवर्णाक्षराने नोंदवला जाईल. विमान वाहतूक सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट सरकारने सुद्धा केंद्र सरकारकडे तशी परवानगी मागावी अशी विनंती केलेली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola