Chipi Airport : सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हा, विमानाचं दहा मिनिटं उशीरानं लॅंडींग
सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. विमानतळावर विमाना उतरताना धावपट्टीवर कोल्हा आला होता. हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्या नंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.