College Reopen : परवापासून महाविद्यालयं सुरू होणार, काय आहे सरकारची नियमावली?
College Reopen : येत्या 20 ऑक्टोबर म्हणजेच परवापासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु होणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जारी केलीय. त्यानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजमधील कॅन्टीन बंद ठेवण्यात येणार आहेत. तर कॉलेज कॅम्पसमधील दुकानंही बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही खेळही टाळावेत, असं आवाहन करण्यात आलंय.