Ratnagiri : रत्नागिरीतील बोटीवरील AIS सिस्टीम चिनी बनावटीची बसवल्याने यंत्रणाचा गोंधळ
भारतीय बनावटीची महागडी ऑटोमॅटिक आयडेंटीफिकेशन सिस्टिम (AIS) न बसवता स्वस्तातली चिनी बनावटीची यंत्रणा बसवुन त्याची नोंद रत्नागिरीतील मच्छीमाराने न केल्याने देशाच्या सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. ट्रॅकिंग केल्यानंतर या नौकेचे मूळ चायना रजिस्ट्रेशन दिसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यंत्रणांना चिनी बोट सिंधुदुर्ग जिल्याच्या सागरी हद्दीत मासेमारी करत असल्याचे रडार सिस्टीम वर माहिती मिळत होती. मात्र पोलिस आणि मत्स्य विभागाने देवगड मध्ये समुद्रात या नौकेवर कारवाई केली.