Golden Week Gridlock: 'चीनच्या इतिहासातील सर्वात मोठा Traffic Jam', ३६ Lane असूनही गाड्या जागेवरच!
Continues below advertisement
चीनमधील (China) 'गोल्डन वीक' (Golden Week) सुट्टीच्या काळात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यंदा चीनच्या इतिहासातला सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम (Traffic Jam) पाहायला मिळाला. अन्हुई (Anhui) प्रांतातील वुझुआंग टोल स्टेशनवर (Wuzhuang Toll Station) तब्बल ३६ लेन (36-Lane) असूनही गाड्या इंचभरही पुढे सरकत नव्हत्या. नॅशनल डे आणि मिड-ऑटम फेस्टिव्हलमुळे चीनमध्ये १ ते ८ ऑक्टोबरपर्यंत सुट्ट्या होत्या, ज्यानंतर घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांमुळे महामार्गांवर अभूतपूर्व गर्दी झाली. या महाकाय ट्रॅफिक जॅमचे ड्रोन व्हिडिओ (Drone Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, रात्रीच्या वेळी हजारो गाड्यांच्या लाल लाईट्सने भरलेले रस्ते सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement