Child Vaccination :देशभर मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ,आतापर्यंत 29 लाखहून अधिक मुलांना पहिला डोस
देशभर मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय. मुलांच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. आतापर्यंत 29 लाखहून अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आलाय. तर कोविन अॅपवर 47 लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केलीय. 2007 किंवा त्याआधी जन्म झालेली मुलं लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन अॅपवर नोंदणी करुन किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करु शकतात. मुलांना सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दिली जातेय.
Tags :
Maharashtra News Vaccination Maharashtra Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Child ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News