Mahayuti Seat Sharing for Lok Sabha : शिंदे आणि अजित पवारांना लोकसभेच्या 10 पेक्षा कमी जागा मिळणार?

Continues below advertisement

Mahayuti Seat Sharing for Lok Sabha : शिंदे आणि अजित पवारांना 10 पेक्षा कमी जागा मिळणार?

Mahayuti Maharashtra Seat Sharing : राज्यात महायुतीमध्ये जागावाटप (Mahayuti Maharashtra Seat Sharing) कळीचा मुद्दा झाला असून शिंदे गट आणि अजित पवार गट आपापल्या भूमिकेवर ठाम असून भाजपसाठी (BJP) स्थिती आव्हानात्मक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपात सबुरीचा सल्ला दिला असला, तरी शिंदे त्यांच्याकडील 13 जागांसाठी ठाम आहेत. दुसरीकडे, अजित पवार 9 जागांसाठी ठाम आहेत. भाजपने 32 जागांसाठी आग्रही असल्याने गुंता अधिक वाढला आहे.

राज्यातील भाजप नेते दिल्लीला रवाना

दरम्यान, आज (6 मार्च) अमित शाह यांच्या गाडीतून सीएम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. याच गाडीत अजित पवार सुद्धा होते, अशी चर्चा आहे. अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते रवाना झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram