Farmers' Agitation: छावा क्रांतिवीर सेनेचं कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

Continues below advertisement
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेने (Chhava Krantiveer Sena) मुंबईत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. 'आमची मागणी ऐकून मामांनी (दत्तात्रय भरणे) जर तात्काळ नाही सोडवली तर आम्ही राज्यभर मोठं जनआंदोलन शेतकऱ्याच्या समोर उभं करणार आहे,' असा थेट इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनामुळे कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत, त्यामुळे तुटपुंजी मदत देऊन चालणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. कृषिमंत्री, जे स्वतः शेतकरी पुत्र आहेत, त्यांनी राज्यभर दौरा करून नुकसानीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola