Prakash Surve Controversy: 'आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे', MLA प्रकाश सुर्वेंच्या विधानाने वाद पेटला

Continues below advertisement
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'एकवेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे', असं धक्कादायक विधान प्रकाश सुर्वे यांनी केलं. या वक्तव्यात त्यांनी मराठी भाषेला आई आणि उत्तर भारताला मावशी संबोधले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना, अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे विधान केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणानंतर टीकेची झोड उठताच, सुर्वे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 'माझ्याकडून चुकून शब्द निघाला, मी मराठी माणसाची माफी मागतो', असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola