Crime Report: 'पोलिसांचा भय उरलाय की नाही?', Sambhajinagar मध्ये तरुणाची हत्या Special Report

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरले आहे, जिथे शहाबाजार परिसरात समीर खान नावाच्या तरुणाची किरकोळ वादातून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर 'शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?', असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जुन्या वैमनस्यातून आणि फळाची गाडी लावण्याच्या वादातून हा खुनी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून, एकाचा शोध सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे शहरातील वाढती गुन्हेगारी, टोळीयुद्ध आणि नशेखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोठा पोलीस फौजफाटा असूनही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola