Sikandar Shaikh : सिकंदर शेखला अटक, कुस्ती विश्वात खळबळ

Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्याने कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 'आमच्या तालमीची आणि लाल मातीची अब्रु घालवली', अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ पैलवान हिंद केसरी दीनानाथ सिंह (Hind Kesari Deenanath Singh) यांनी दिली आहे. सिकंदरवर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात पपला गुर्जर (Papla Gurjar) टोळीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे. मोहाली पोलिसांनी (Mohali Police) सिकंदरसह एकूण चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ पिस्तूलं, जिवंत काडतुसं, रोख रक्कम आणि दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सिकंदरच्या वडिलांनी मात्र आपल्या मुलाला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे. सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचा असून तो कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान आहे. त्याने २०२४ मध्ये महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम-ए-हिंदचा किताब जिंकला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola