
Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी
Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी
हे ही वाचा..
: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या आणि उतरती कळा लागलेल्या राज्यातील काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नुकतीच हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हर्षवर्धन सपकाळ हे मंगळवारी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाचा (Maharashtra Congress President) पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ हे सोमवारी मुंबईत दाखल झाले. एरवी प्रदेशाध्यक्ष म्हटले की, पक्षाची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या दिमतीला असते. मात्र, हर्षवर्धन सपकाळ सोमवारी खासगी कारने मुंबईत दाखल झाले. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी गिरगाव येथील नाना चौकात असणाऱ्या सर्वोदय आश्रमात मुक्काम केला. रात्रभर ते जमिनीवर झोपले. याबाबत त्यांना विचारलं असता , ते म्हणाले की, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरंजामी आणि तालेवार नेत्यांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झालेल्या काँग्रेस पक्षातील हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. काँग्रेस पक्षातील आगामी बदलांची नांदी ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.