Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

Continues below advertisement

Chhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले 

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आचारसंहिता काळात छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले आहेत. 

संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता त्यांना यात 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका नामांकित ज्वेलर्सचे असल्याची माहिती सध्या मिळत आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram