MP Sambhaji Raje | मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे घ्या, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. सोबतच कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करण्याचीही मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात आरे आणि नाणार आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले आहेत. आरे आणि नाणार प्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरु झाली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
Continues below advertisement