Artificial Yamuna: 'PM Modi साठी फिल्टर पाण्याची नकली यमुना', AAP नेते Saurabh Bharadwaj यांचा BJP वर गंभीर आरोप

Continues below advertisement
दिल्लीत छठ पूजेच्या महापर्वावरून राजकीय वातावरण तापले आहे, ज्यामध्ये आम आदमी पार्टी (AAP) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'वासुदेव घाट पर पीएम मोदी के छठ मनाने के लिए बीजेपी ने नकली यमुना बनाई है,' असा थेट आरोप 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. भारद्वाज यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी वासुदेव घाटावर गंगेचे शुद्ध पाणी आणून एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला, तर दुसरीकडे पूर्वांचली भक्तांना यमुनेच्या प्रदूषित आणि मलयुक्त पाण्यात पूजा करण्यास भाग पाडले जात आहे. यमुनेच्या पाण्यात 'फिकल कॉलिफॉर्म'चे प्रमाण जास्त असल्याने ते आंघोळीसाठी देखील अयोग्य असल्याचे 'आप'ने म्हटले आहे. यासंदर्भात सौरभ भारद्वाज यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola