Chhath Puja Review: मुंबईत UP-Bihar च्या वाढत्या लोकसंख्येमुळे पूजेचे महत्त्व वाढले, मंत्री मंगलप्रभात लोढांकडून तयारीची पाहणी
Continues below advertisement
मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवरील तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी, मुंबई महापालिकेकडून छठ पूजेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठ आणि मंडपाची, तसेच पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी लोढा यांनी केली. मुंबईमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची वस्ती वाढत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून छठ पूजेचे महत्त्व वाढले आहे. यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरवर्षी, उत्तर भारतीय भाविक मोठ्या संख्येने जुहू चौपाटी, दादर चौपाटी आणि इतर जलस्थानांवर सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी एकत्र येतात. यावर्षी छठ पूजा २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement