Zero Hou Poll : 'राज्यात कायदा-सुव्यवस्थेची दुरावस्था', सर्वसामान्यांचा 57% कौल

Continues below advertisement
फलटणमध्ये एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर जनतेने चिंता व्यक्त केली आहे. 'राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची दुरावस्था झाली आहे', असं एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांना वाटतंय. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. याच संदर्भात झालेल्या एका पोलमध्ये २४,००० लोकांनी भाग घेतला, ज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या दुरावस्थेला पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेतेही जबाबदार असल्याचे पर्याय निवडले गेले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola