Guardian Minister Row: 'महाजन, भुसे आता Trump कडे जाणार का?', छगन भुजबळ यांचा टोला
Continues below advertisement
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा (Nashik Guardian Minister) तिढा कायम असून, या पदासाठी भाजपचे (BJP) गिरीश महाजन (Girish Mahajan), शिवसेनेचे (Shiv Sena) दादा भुसे (Dada Bhuse) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) प्रमुख दावेदार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, 'पालकमंत्रीपदासाठी महाजन भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे (Donald Trump) जाणार आहेत का? मी फार तर मोदींकडे (PM Modi) जाईन,' असा खोचक सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे. भुजबळ पुढे म्हणाले की, आपण मदतीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि फार फार तर पंतप्रधान मोदींपर्यंत जाऊ शकतो. पण इतक्या लांब, थेट ट्रम्प यांच्याकडे कसे जाणार, असा टोला त्यांनी आपल्या स्पर्धकांना लगावला. महायुतीमधील या स्पर्धेमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती रखडली असून, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, असे चित्र आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement