Chhagan Bhujbal Speech : ये 24 डिसेंबरला नाशिकला, बघतो...जरांगेंना ओपन चॅलेंज, भुजबळ आक्रमक

भिवंडी : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आपला सरपंचही होणार नाही,  असं म्हणत पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी सभेतून (OBC Sabha) हल्लाबोल केलाय. भिवंडीमध्ये (Bhiwandi) ओबीसी निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये पुन्हा एकदा भुजबळांनी आक्रमक भाषण करत मनोज जरांगेंवर (Manoj Jarange) निशाणा साधलाय. त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधील वाक् युद्ध अजूनही सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा समाजाला आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध हा गुंडगिरी, जाळपोळ करणाऱ्यांना आणि झुंडशाहीला आहे, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.  जरांगे पाटील म्हणतो की भुजबळ एकटा खातो, पण तु तुझ्या सासरवाडीचं खातोस, असं म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टीका केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola