Munde Legacy War: 'वारसदार पोटचा नसून विचारांचा असतो', Bhujbal यांच्या विधानामुळे Munde घराण्यात वाद!
Continues below advertisement
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बीडमधील (Beed) ओबीसी मेळाव्यात केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे घराण्यातील वारसा हक्काचा वाद पेटला आहे. 'वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो' असं म्हणत छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेच गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारसदार असल्याचं जाहीर केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भुजबळांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे, तर दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे मामा प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मुंडे भाऊ-बहिणींमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नये, असा सल्ला महाजन यांनी भुजबळांना दिला आहे. भुजबळांनी आधी स्वतःचा वारसदार ठरवावा, मग दुसऱ्यांच्या घरात डोकावावे, असेही महाजन म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement