Chhagan Bhujbal On Sharad Pawar : ओबीसींना आरक्षण देण्यात पवारांची भूमिका होती- छगन भुजबळ

Continues below advertisement

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : ओबीसींना आरक्षण देण्यात पवारांची भूमिका होती- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: ना अजित पवार, ना सुनील तटकरे, पवारांच्या भेटीला जाताना भुजबळांनी कुणाला सांगितलं?

मुंबई: आज राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी सिल्व्हर ओकवरती दाखल झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये भेट झाली या भेटवेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर शरद पवार यांना भेटण्याआधी त्यांनी पक्षातील कोणत्या नेत्याला याबाबत कल्पना दिली होती का या प्रश्नावर बोलताना भुजबळांनी मी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. 

भुजबळ पुढे म्हणाले, "मी निघताना घरून निघताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मला जा असं सांगितलं". 

सिल्व्हर ओकवरील भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? 


गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram