Chhagan Bhujbal : OBC आरक्षणाला नेमकं कोण विरोध करतंय? सांगतायत छगन भुजबळ

Continues below advertisement

OBC Reservation : राज्यात रखडलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अडथळे आणले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  राहुल वाघ आणि विकास गवळी यासारखे लोक OBC आरक्षणाला बाधा येईल अशी कृती करत आहेत. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रक्रिया लांबवली आहे. हे लोकं भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात याचिका करायची, असा भाजपचा दुहेरी डाव सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भाजप नेत्यांच्या अशा पावित्र्यामुळे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram