Chhagan Bhujbal Nashik : समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांंचं महायुतीवर दबावतंत्र ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal Nashik : समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांंचं महायुतीवर दबावतंत्र ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेकडून महायुतीवर दबावतंत्र सुरु असल्याची चर्चा आहे. कारण समता परिषदेच्या पाच पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणता उतरणार आहेत. पाचही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज घेतले असून, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीड, अहमदनगर, कल्याण मतदारसंघातून अर्ज घेण्यात आलेत.
राज्यभरात 5 जागांवर समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. पाचही पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीड, दक्षिण अहमदनगर आणि कल्याण या मतसंघातून समता परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. समता परिषदेच्या आडून भुजबळांचा ओबीसींची ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.