Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय अर्थ काय?

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय अर्थ काय?

मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन कालच (14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.

....तरी शरद पवार यांनी दिली भेटीची वेळ 

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाहीये. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना? असे आता विचारले जात आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram