OBC Politics: 'कोण बबनराव तायवडे माहित नाही', Chhagan Bhujbal थेट सवाल
Continues below advertisement
महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण पुन्हा एकदा तापले असून, मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. 'कोण बबनराव तायवडे आपल्याला माहित नाही', अशी थेट प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचा जरांगेंसोबतचा जुना व्हिडिओ भुजबळ यांनी जाहीर सभेत दाखवल्याने तायवाडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. एखाद्या नेत्याची चूक अशाप्रकारे सर्वांसमोर आणणे योग्य नसल्याचे मत तायवाडे यांनी मांडले होते. या टीकेला उत्तर देताना भुजबळ यांनी तायवाडेंना ओळखत नसल्याचे सांगत या वादाला नवे तोंड फोडले आहे. या घटनेमुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement