Chhagan Bhujbal : 11 हजार 530 प्रकरणात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय- भुजबळ
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल एकमुखाने स्वीकारण्यात आला. 11 हजार 530 प्रकरणं सापडली आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय झाल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी, वाद झाल्याच्या चर्चा भुजबळांनी फेटाळल्या.