Chhagan Bhujbal : भुजबळांचा नेमका गेमप्लॅन काय ? एकाच वेळी अनेकांशी पंगा
Chhagan Bhujbal : भुजबळांचा नेमका गेमप्लॅन काय ? एकाच वेळी अनेकांशी पंगा महायुती सरकारमधील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक म्हणजे छगन भुजबळ. त्यांच्या मनात सध्या नेमकं काय सुरूय हे कळायला मार्ग नाहीये. असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे, भुजबळांनी अलीकडच्या काळात अनेक दिग्गज किंवा धुरंदर व्यक्तींशी एकाच वेळी पंगा घेतला आहे. आणि तोही एकाच मुद्द्यावर, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसींचं संरक्षण. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी नेमलेली शिंदे समिती बरखास्त करा, अशी जाहीर मागणी भुजबळांनी केली. एकूणच काय, आपल्या भूमिकेचा भाग म्हणून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे ३२ वर्षं बॉस राहिलेले शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मराठा आरक्षणाचा आजचा चेहरा असलेले मनोज जरांगे, या सर्वांना भुजबळांनी जाहीररित्या चॅलेंज केलं आहे. आता भुजबळांना यातून नक्की काय साधायचंय, ते कळायला मार्ग नाहीये. एक मात्र नक्की, की ज्याप्रमाणं जरांगे मराठा आंदोलनाचा चेहरा बनलेत, त्याचप्रमाणं भुजबळ हे ओबीसींचा चेहरा म्हणून अधिक ताकदीनं समोर आले आहेत. याची परिणीती नेमकी कशात होते, ते पाहणं बाकी आहे.