Chhagan Bhujbal : Jitendra Awhad यांचा निषेध करा आमचं काही म्हणणं नाही, पण... भुजबळ काय म्हणाले?

Continues below advertisement

नाशिक : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांनी महाड (Mahad) येथील चवदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृतीचे (Manusmriti) दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr Babasaheb Ambedkar) फोटो फाडण्यात आला. यावरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. आव्हाडांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे भुजबळांनी म्हटले. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भुजबळांवर निशाणा साधला होता. आता भुजबळांनी दरेकरांना उत्तर दिले आहे.   

छगन भुजबळ म्हणाले की, दरेकर काय म्हणाले तो त्यांचा प्रश्न आहे. आव्हाडांना विरोधासाठी विरोध करू नका. मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. जितेंद्र आव्हाड हे विरोधक आहे. त्यांचा विरोध निश्चितच करा. आमचं काही म्हणणं नाही, असे ते म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram