Chhagan Bhujbal : Jitendra Awhad यांच्या बचावाला भुजबळ मैदानात, म्हणाले, पोस्टर चुकून फाडलं

Continues below advertisement

मुंबई : विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. B. R. Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा केला जातोय. त्यानंतर सत्ताधारी भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. आव्हाड यांचा निषेध केला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी माफी मागितली आहे, असे म्हणत भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे.     

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेने महाडला गेले. त्यांनी चुकून फोटो फाडला. त्यांनी माफी मागितली आहे. मला वाटतं की आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काहीही अर्थ नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे, या मुद्द्यावरून लक्ष विचलीत होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावरच लक्ष केंद्रीत होईल, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram